सावली आपली कधीही साथ सोडत नाही असे म्हणतात. पण हीच सावली गायब होणार आहे. खरे तर वर्षातून दोनदा घडणारी ही भौगोलिक घटना आहे. जेंव्हा मध्यान्हाचा सूर्य बरोबर आपल्या शहरातील अक्षांशावर येतो, तेंव्हा हि स्थिती अनुभवता येते.
दि . १ ७ मे २ ० २ ५ रोजी, सकाळी १ १ :३ ० ते १ २ :३ ० दरम्यान आकाश मित्र, कल्याण आणि सुभेदार वाडा कट्टा , संयुक्त विद्यमाने आयोजित आगळ्या वेगळ्या उपक्रमात झिरो शॅडो डे निरीक्षण केले जाणार आहे. आकाश मित्र मंडळाचे खगोल अभ्यासक श्री . हेमंत मोने यावेळी मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. तेंव्हा आपण आपल्या लहान मुलांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहा . आणि ह्या अनोख्या घटनेचे साक्षीदार व्हा.
ठिकाण: सुभाष मैदान, अत्रे रंगमंदिरा मागे, कल्याण (पश्चिम)
संपर्क : श्री . संजय पांडे – ९ ८ १ ९ २ ८ ८ ६ ८ ०