कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अनेक नशा केलेले व्यसनाधीन झालेले इसम हे फिरत असतात. तसेच त्यांचे कोणतेही नातेवाईक मिळून येत नाहीत. ते सतत नशेमध्ये राहत असून त्यांच्या हातून एखादा गंभीर गुन्हा घडण्याची दाट शक्यता असते. त्यांचे व्यसन सुटण्याकरीता पोलिसांमार्फत त्यांना ताब्यात घेवून दिशा सामाजिक सेवा संस्था, गोवेली, ता. कल्याण, जि. ठाणे येथील व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी दाखल करवून घेतले जात आहे.
ह्या इसमांना उपचारासाठी दाखल केल्यावर प्रथमत: त्यांचे औषधोपचारांच्या सहाय्याने डिटॉक्सिफिकेशन केले जाते. काहींना मानसिक उपचार देण्याचीही गरज असते. त्याप्रमाणे मानस उपचार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु केले जातात.
तसेच त्यांना संस्थेच्या प्रोसेस मध्ये समाविष्ट केले जाते. त्यांच्याकडून रोज नियमित व्यायाम आणि योगा करवून घेतला जातो. त्यांचे समुपदेशनही केले जाते. त्यांचे मन प्रफुल्लीत करण्यासाठी त्यांना कॅरम, लुडो यांसारखे गेम्स खेळायला दिले जातात. तसेच धार्मिक पुस्तकेही वाचावयास दिली जातात. त्यांचे आयुष्य सकारात्मक व्हावे यासाठी संस्थेकडून सर्व प्रयत्न केले जातात.
उपचार पूर्ण झाल्यावर ह्या इसमांना पुनर्वसनासाठी ते करू शकतील अशी कामे दिली जातात जेणेकरून भविष्यात त्यांना चोरी किंवा इतर दुष्कृत्य न करता व सहज मिळणारा पैसा यापेक्षा स्वतःच्या कष्टाने पैसे कमवून जीवन जगता यावे, यावर भर दिला जातो. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यांना शेतीची व इतर कामे दिली जातात. तसेच त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय या कालावधीत विनामूल्य केली जाते.
हे सुद्धा वाचा: दिशा सामाजिक सेवा संस्था – एक पाऊल व्यसनमुक्तीकडे
दिशा सामाजिक सेवा संस्थेत दाखल झालेल्या काहींची मुलाखत: