“सावळे सुंदर रूप मनोहर”
विठ्ठलाचे अभंग, भक्तिगीते ही विठ्ठलभक्तांसाठी पर्वणी असते. संत निवृत्तीनाथांपासून ते समर्थ रामदासांपर्यंत सर्वांनी त्याचे गुणगान केले आहे. अशा अभंग आणि भक्तिगीतांचे गेय रूपातील सादरीकरण अनेक कार्यक्रमात आपण बघतो. पण ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे हे अभंग, गोंधळ, गवळण, भक्तिगीते वाद्यांवर महिला वादकांकडून सादर करण्यात येणार आहेत. दोन तासांच्या या कार्यक्रमात पारंपरिक अभंगांपासून ते आजच्या नव्या भक्तिगीतांचे वाद्यांवर सादरीकरण होईल. या कार्यक्रमात व्हायोलिन, सतार, हार्मोनिअम, की-बोर्ड या सूर वाद्यांवर महिला वादक हे अभंग सादर करणार असून, तबला, पखावज, पॅड, कहोन या तालवाद्यांच्या साथीने याला कथ्थक नृत्याचीही जोड देण्यात येणार आहे. तरी सर्व कल्याणकर रसिकांनी नक्की/आवर्जून कार्यक्रमाला यावे.
निरूपण – अनघा मोडक
कथ्थक – राधिका जैतपाळ
सतार – कल्याणी देशपांडे
हार्मोनियम – शुभदा गायकवाड
कीबोर्ड – सुखदा भावे – दाबके
कीबोर्ड – राधिका भिडे
व्हायोलिन – वेधा पोळ
तबला – गायत्री पाध्ये
ऑक्टोपॅड – प्रिया वझे
पखवाज – श्रुतिका मोर्ये
तालवाद्ये – स्वप्नगंधा करमरकर
ध्वनी संयोजन – सर्वेश गोखले
सादर कार्यक्रम दिनांक : १ ८ मे २ ० २ ५ रोजी सायंकाळी ७ वाजता यशवंत चव्हाण ग्राउंड, रामबाग, कल्याण (पश्चिम ) येथे संपन्न होणार आहे .