Close Menu
Explore Kalyan CityExplore Kalyan City
    अधिक पहा:
    • कविता
    • आरोग्यवर्धक
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान
    • न्युज आणि मीडिया
    Facebook X (Twitter) Instagram
    • कविता
    • आरोग्यवर्धक
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान
    • न्युज आणि मीडिया
    Facebook Instagram YouTube
    Explore Kalyan CityExplore Kalyan City
    • मुख पान
    • कला आणि संस्कृती

      हिंदु नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त सांगितिक कार्यक्रम ‘मिळुनी आम्ही साऱ्याजणी’

      अधिक वाचा

      कर्मयोगाचे शास्त्रशुद्ध शिक्षण (नि:शुल्क)

      अधिक वाचा

      उज्वला मंडळ ‘अमृत वर्ष’ सांगता समारंभ

      अधिक वाचा

      कल्याण पूर्वेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे शानदार सोहळ्यात अनावरण

      अधिक वाचा

      माघी गणेशोत्सवानिमित्त कल्याणात साकारणार 70 फूट भव्य श्रीराम मंदिर प्रतिकृती

      अधिक वाचा
    • प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व

      डॉ. चंद्रशेखर आष्टीकर – श्रीनिजधामानंदस्वामीं

      अधिक वाचा

      विश्वास शंकर कुळकर्णी – संपादक, साप्ताहिक कल्याण वैभव

      अधिक वाचा

      महिलांचे कर्तृत्व – सौ. सीमा जयंत गोखले

      अधिक वाचा

      श्री. अविनाश वैद्य – प्रवास एका व्यसनमुक्तीचा

      अधिक वाचा

      अष्टपैलू व्यक्तिमत्व – स्वप्नगंधा रमेश करमरकर

      अधिक वाचा
    • वैद्यकीय
      1. आरोग्यवर्धक
      2. पुनर्वसन केंद्रे
      3. View All

      मानसिक आरोग्य ; सारथी कौन्सिलिंगचा “लेट्स टॉक मेंटल हेल्थ” उपक्रम

      अधिक वाचा

      क्रोध नियंत्रणाचे उपाय शिकवणारी मानस-मनोदयची ‘रागदारी’ कार्यशाळा

      अधिक वाचा

      बाप्पा पावला : कल्याणकरांना लवकरच मिळणार “सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल” – आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याला यश

      अधिक वाचा

      मानसिक आजार – कारणे आणि उपाय

      अधिक वाचा

      कल्याण स्टेशन परिसरामध्ये फिरस्ते, व्यसनाधीन झालेले इसम व्यसनमुक्ती केंद्रात दाखल

      अधिक वाचा

      दिशा सामाजिक सेवा संस्थेत साजरी झाली गुरुपौर्णिमा

      अधिक वाचा

      दिशा सामाजिक सेवा संस्था येथे कॉम्प्यूटराइज्ड पद्धतीने व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

      अधिक वाचा

      दिशा सामाजिक सेवा संस्था – एक पाऊल व्यसनमुक्तीकडे

      अधिक वाचा

      5 दशकांपासून मृत्यूला आस्मान : कल्याणच्या या मृत्युंजयाची इंडिया, एलाईट बुककडून दखल

      अधिक वाचा

      कौतुकास्पद : कल्याणातील इंडीयन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरमध्ये तिघा रुग्णांना मिळाले जीवदान

      अधिक वाचा

      अभिमानास्पद : कल्याणातील जी प्लस रुग्णालयात हृदयातील तीन ब्लॉकवर एकाच वेळी यशस्वी उपचार

      अधिक वाचा

      दिशा सामाजिक सेवा संस्था येथे कॉम्प्यूटराइज्ड पद्धतीने व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

      अधिक वाचा
    • जागरूकता

      कल्याण पश्चिमेमध्ये पोलीसांकडून काढण्यात आला रूटमार्च

      अधिक वाचा

      थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचा प्लॅन केलाय, मग पोलिसांनी दिलीय ही महत्त्वाची माहिती

      अधिक वाचा

      कल्याणातील आयमेथॉनमध्ये धावले 5 हजार धावपटू ; सामाजिक संस्थेच्या मदतीसाठी राबवण्यात आला उपक्रम

      अधिक वाचा

      केडीएमसी अग्निशमन दलातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

      अधिक वाचा

      जागतिक मनआरोग्यदिनानिमित्त “श्लोक मनाचे, आरोग्य मनाचे” कार्यक्रमाचे आयोजन

      अधिक वाचा
    • सण आणि उत्सव

      वीटभट्टीवरील या वंचित मुलांच्या चेहऱ्यावर उमटला सप्तरंगी आनंद; अनुबंध संस्थेतर्फे अनोख्या होळीचे आयोजन

      अधिक वाचा

      आला गणेशोत्सव, आला अगरबत्ती उत्सव!

      अधिक वाचा

      रामनवमी

      अधिक वाचा

      होळी

      अधिक वाचा
    • स्थळे

      बिर्ला मंदिर

      अधिक वाचा

      पोखरण मंदिर – अध्यात्म आणि विज्ञान यांचा अनोखा मिलाफ

      अधिक वाचा

      लोनाडची लेणी

      अधिक वाचा

      सुभेदार वाडा – एक ऐतिहासिक वास्तू

      अधिक वाचा

      काळा तलाव

      अधिक वाचा
    • क्राईम वॉच

      भारत-पाक तणाव: सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर होणार कठोर कारवाई

      अधिक वाचा

      कल्याण पूर्वेच्या कचोरेतील आरएसएसच्या शाखेवर दगडफेक; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

      अधिक वाचा
    Explore Kalyan CityExplore Kalyan City
    तुम्ही आता येथे आहात -Home»प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व»श्री. अविनाश हरड – ओळख एका सच्च्या सामाजिक कार्यकर्त्याची

    श्री. अविनाश हरड – ओळख एका सच्च्या सामाजिक कार्यकर्त्याची

    382 Views

    सामाजिक कार्यकर्ता म्हणजे काय?

    सामाजिक कार्यकर्ता तो असतो जो लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यात आणि त्यांचा सामना करण्यास मदत करतो. सामाजिक कार्यकर्ता समाजातील लोकांचे कल्याण करणे, त्यांच्या मूलभूत आणि जटिल गरज पूर्ण करणे आणि लोकांना एक चांगले जीवन जगण्यास मदत करण्याचे काम निर्हेतुकपणे करत असतो.

    तर आज आपण अश्याच एका सच्च्या कार्यकर्त्याला भेटत आहोत. अश्वमेध प्रतिष्ठानचे संचालक श्री. अविनाश हरड ह्यांना.

    श्री. अविनाश हरड ह्यांचा जन्म महाराष्ट्रातील ‘तलासरी’ येथे ३ जून १९८२ साली झाला. शालेय शिक्षणानंतर त्यांनी बॉ. कॉम. (B, Com.) केले व त्यानंतर त्यांनी इंडोलॉजी मध्ये एम. ए. केले (M. A. in Indology). सध्या ते एल. एल. बी. करत आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. त्यांची ‘अश्वमेध प्रतिष्ठान’ नावाची मुरबाड तालुक्यातील ‘मासले – बेलपाडा’ येथे एक सामाजिक संस्था आहे. त्यांच्या अश्वमेध प्रतिष्ठान विषयी आपण माहिती करून घेऊ.

    सन २००२ मध्ये २० महाविद्यालयीन तरूणांनी एकत्र येऊन या संस्थेची सुरूवात केली. प्रारंभीचा उत्साह वृक्षलागवड, दुर्ग भ्रमण व दुर्गस्वच्छता एवढ्यापुरताच मर्यादित होता. याच दरम्यान २००५ मधील महापुरात रायते गावाची दुर्दशा झाली. संपूर्ण गाव पूरग्रस्त होता. उल्हास नदीवरील पुलाचा काही भाग वाहून गेल्याने कल्याणशी संपर्क तुटला होता, ३५ घरे वाहून गेली होती. अशा आपतकालीन परिस्थितीत पुरात अडकलेल्या ग्रामस्थ व जनावरांची सुटका, पुरग्रस्त लोकांना अत्यावश्यक्त वस्तुंचे वाटप तसेच पूर ओसरल्यावर ग्रामस्वच्छता अशी विविध कामे संस्थेच्या कार्यकर्त्यानी हिरिरिने केली. केवळ प्रसिद्धीच्या मोहाने केलेल्या रंगीबेरंगी उत्सवांपेक्षा अशा कामांतून निळणारे समाधान व आत्मविश्‍वास लाखमोलाचे ठरले.

    २००५ पासून सिद्धगड या आपातकालीन परिस्थितीत असलेल्या भिमाशंकर अभयारण्यातील वस्तीच्या पुनर्वसन आंदोलनाचे नेतृत्त्व:

    भीमाशंकर अभयारण्यात असलेल्या सिद्धगड या छोट्याशा गावावर ओढवलेली आपत्ती तर रायतेवर आलेल्या आपत्तीपेक्षा मोठी होती. सतत कोसळणाऱ्या दरडी व शेतजमीनीला पडलेले मोठमोठे तडे यांमुळे किल्ल्यावर राहणाऱ्या आदिवासींच्या हालांना पारावार उरला नव्हता. या घटनेने ‘अशवमेध’ ला निश्‍चित ध्येय मिळवून दिले ते किल्ल्याच्या संवर्धनाबरोबरच वस्तीच्या पुनर्वसनाचे. यानंतर अमलात आलेल्या वनहक्क कायद्याची अंमलबजावणी असो की  शासनाकडे पुनर्वसनासाठी पाठपुरावा, अश्वमेध प्रतिष्ठानने या प्रक्रियेत यशस्वीपणे गावकऱ्यांचे प्रतिनिधित्व केले.

     

    २०१२ मध्ये ‘सह्यावलोकन’ या उपक्रमाची सुरूवात. या अंतर्गत सह्यादीच्या डोंगर-दऱ्यांतून सायकलभरनंती व विविध पैलूंच्या दस्तावेजीकरणाचा छोटासा प्रयत्न.

    स्थानिक उपक्रम :

    • नियमित रक्तदान शिबिरे (आतापर्यत २० शिबिरे).
    • स्वयंसहाय्यता बचत गटांना मार्गदर्शन.
    • ग्रामीण भागात शेतकरीसंघ (नाबार्ड) स्थापनेत पुढाकार.
    • माहितीपर कार्यक्रम तसेच स्लाईड शोजचे नियमित आयोजन.
    • अवकाश दर्शन शिबिरे.
    • चित्रकला, वकृत्व स्पर्धांचे आयोजन.
    • सलग तीन वर्षे उल्हास नदी स्वच्छता अभियानाचे आयोजन.

     

    आपातकालीन व्यवस्थापन पथक:

    • पथकासाठी आवश्यकत साहित्य गोळा करून सराव सुरू केला,
    • जिल्हा नियंत्रण कक्ष, नागरी संरक्षण दल यांच्याकडून प्रशिक्षण मिळविले व त्यांच्या सराव कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला,
    • २००६ पासून गणपती विसर्जनामध्ये पोलीसदलाबरोबर मदतगट तैनात.
    • २००६ मध्ये गणपती विसर्जनावेळी बुडणाऱ्या चार भाविकांना वाचविल्याबदूदल पोलीस गहासंचालक डॉ. सत्यपाल सिंह व पोलीस  अधिक्षक श्रीमती अर्चना त्यागी यांच्या कडून पथकाचा गौरव.
    • २००८ मध्ये गणपती विसर्जनावेळी बुडणाऱ्या दोन भाविकांना वाचविल्याबदूदल पोलीस उप-अधिक्षकांकडून पथकाचा गौरव.
    • या पथकातर्फे  मर्यादित संसाधनांचा वापर करून अभयारण्य व विविध किल्ल्यांवर स्वच्छता शिबिरांचे आयोजन.
    • रस्त्यावरील अपघातात मदत तसेच बुडालेल्या व्यक्तिंचे मृतदेह शोधण्यास प्रशासनाला मदत.
    • २००९ मध्ये गणपती विसर्जनावेळी बुडणाऱ्या दोन भाविकांना वाचविल्याबदूदल पोलीस उप-अधिक्षकांकडून पथकाचा गौरव.
    • २०११ पासून शाळा व कॉलेजांमध्ये आपत्ती निवारण मार्गदर्शन शिबिरे.

     

    वनविभागाच्या मार्गदर्शन व सहकार्याने पशू-पक्ष्यांसाठी मदत केंद्र:

    • मानवी वस्त्यांमध्ये सापडलेल्या सापांची मदत व सुटका.
    • नागपंचमीला गारूड्यांकडून सर्प हस्तगत करण्यासाठी पोलीस दलाबरोबर सलग तीन वर्षे अभियान.
    • जखमी अवस्थेतील प्राणी व पक्ष्यांवर उपचार.
    • वन्यजीवांबद्दल प्रेम व आदर वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन.
    • ग्रामीण भागात स्थानिक पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन.
    • २०११ मध्ये मुंबई येथे अखिल महाराष्टू पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन.
    • जखमी प्राणी – पक्ष्यांसाठी ‘संक्रमण सुविधा’ (Transit Facility) लवकरच सुरू होत आहे.

     

    संदर्भ ग्रंथालय:

    • शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय सर्वासाठी विनामुल्य ग्रंथालयाची सुरूवात.
    • एकूण पुस्तक सख्या ३०००. यापैकी लहानमुलांना आवश्यक अशा संदर्भासाठी उपलब्ध पुस्तके अंदाजे १०००.
    • स्थानिक परंपरा, साहित्य, इतिहास, भूगोल, पर्यावरण यासंदर्भातील माहितीचे, पुस्तकांचे व छायाचित्रांचे संकलन.
    • ग्रंथालयातर्फे प्रकल्प बनविणे, संदर्भ शोधणे यासाठी स्पर्धांचे आयोजन.

    संग्रहालय:

    • आपला समृद्ध वारसा जतन व्हावा व त्याचा अभ्यास व्हावा या उद्‌देशाने पद्मर्षी सदाशिव गोरक्षकर सरांच्या मार्गदर्शनाने ‘उल्हास संग्रहालय व संशोधन’ संस्थेची सुरूवात झाली.
    • मुरबाड इतिहास संशोधन मंडळाची सुरूवात.
    • सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी ऐतिहासिक वस्तू, दस्तावेज यांचे संकलन.
    • विविध चर्चासत्रे, संमेलने, व्याख्याने इ. कार्यक्रमांमध्ये सहभाग.
    • छोट्या कार्यकर्त्यांसह नियमितपणे संग्रहालयांना भेटी व चर्चा.
    • ग्रामीण भागातील तरूणांसाठी महाराष्ट्रभर संग्रहालय अभ्यासदौरे.
    • इतिहास संशोधन व संवर्धन कार्यशाळांचे आयोजन.
    • ‘उल्हास संग्रहालय व संशोधन संस्था’ या उपक्रमासाठी कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेतर्फे टिटवाळा येथे जागा देण्यात आली आहे. लवकरच या संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे.

    पद्मश्री सदाशिव गोरक्षकर संग्रहालयासंदर्भात मार्गदर्शन करताना

    रोपवाटीका:

    • लहान मुलांच्या मदतीने दरवर्षी झाडांच्या बिया गोळा करण्याचा व वाटपाचा कार्यक्रम.
    • काही दुर्मिळ बियाणांपासून रोपांची निर्मिती.
    • कॉलेज, संस्थांना या दुर्मिळ रोपांचे विनामूल्य वितरण.
    • दुर्मिळ वनस्पर्तीच्या संवर्धनाचा प्रयत्न.
    • किल्ल्यांवर वृक्षारोपण.

    लघुपट व माहितीपट निर्मिती:

    • २०१३ – गिरीमनित्र संनेलन १२ वे येथे दृकश्राव्य स्पर्धत ‘सह्यावलोकन – भाग १’ या माहितीपटास द्वितीय पारितोषिक.
    • २०१४ – माहितीपट ‘समिधा’.
    • २०१५ – गिरिमित्र संमेलन १४ वे येथे दृकश्राव्य स्पर्धत ‘सह्यावलोकन – भाग २’ या माहितीपटास तृतीय पारितोषिक.

    पर्यावरण संवर्धनात्मक उपक्रम व चळवळी:

    • मासले – बेलपाडा भागातील जैवविविधतेने समृद्ध अशा जंगलाला राखीव जंगल (Conservation Reserve) म्हणून घोषित करून अभयारण्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न.
    • याच जैवविविधतेने समृद्ध अशा जंगलाची विल्हेवाट रोखण्यासाठी चळवळीची सुरूवात झाली.

    वन विभागाबरोबरील उपक्रम:

    • दरवर्षी मासले – बेलपाडा भागातील जंगलात लागणारे वणवे रोखण्यासाठी जाळरेषा (Fire Line) घेणे.
    • वाहून जाणारे नैसर्गिक पाणी साठवण्यासाठी पावसाळ्या आधी श्रमदानातून वनराई बंधारे बांधणे.
    • वनवासींतर्फेच वनवैभव जतन करून वाढविण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांच्या आयोजनात मोलाचा वाटा.
    • ३१ डिसेंबर या वर्षसमाप्तीच्या निमित्ताने वनविभागाच्या हद्दीतील पळू – सोनावळे येथील गणेश गडद या प्राचीन नेण्यांपर्यत जाणारी १५० वर्षे वापरात नसलेली वाटेची स्वच्छता केली.

    व्यक्तिमत्व

    इतिहास संशोधनात्मक कार्य:

    • माळशेज घाटातील ऐतिहासिक लेण्याचा (पहारेकऱ्यांच्या चौक्या) शोध.
    • मुरबाड तालुक्यातील पळू गावाजवळील डोंगरांमधील प्राचीन लेण्यांचा शोध.

    अश्वमेध प्रतिष्ठानचा पत्ता:
    अश्वमेध भवन’, मासले-बेलपाडा, पो. ता. मुरबाड, जि. ठाणे. ४२१ ४०१.
    संपर्क: 07588726310 / 98108208934
    ई-मेल: ashwamedh.org@gmail.com

    Share. Facebook Twitter WhatsApp Telegram Email

    संबंधित लेख

    डॉ. चंद्रशेखर आष्टीकर – श्रीनिजधामानंदस्वामीं

    अधिक वाचा

    विश्वास शंकर कुळकर्णी – संपादक, साप्ताहिक कल्याण वैभव

    अधिक वाचा

    महिलांचे कर्तृत्व – सौ. सीमा जयंत गोखले

    अधिक वाचा
    Leave A Reply Cancel Reply

    मन मानसी

    नमस्कार, मी मानसी…आपल्या सगळ्यांच्याच  रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या साध्या साध्या प्रसंगातून, घटनांतून, मला पटकन जाणवून जाणाऱ्या..अगदी लोकल ने प्रवास करताना पटकन कुठे काही निरिक्षणातून सुचलेल्या… भावना, व्यथा, आनंद, विनोद, … व्यक्त करणाऱ्या मला अचानक सुचलेल्या या माझ्या गोष्टी.. आणि ललित लेख आहेत…

    खरं तर..मी एक सामान्य चाकरमानी व्यक्ती आहे…एकीकडे नोकरी आणि एलएलबीच शिक्षण.. अशा दोन दगडांवर पाय ठेवून जमेल तितकं .. लिहायचा प्रयत्न करतेय..

    अधिक वाचा: मन मानसी

    Website starts from INR. 5999/-

    आरोग्याबद्दल

    5 दशकांपासून मृत्यूला आस्मान : कल्याणच्या या मृत्युंजयाची इंडिया, एलाईट बुककडून दखल

    कौतुकास्पद : कल्याणातील इंडीयन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरमध्ये तिघा रुग्णांना मिळाले जीवदान

    अभिमानास्पद : कल्याणातील जी प्लस रुग्णालयात हृदयातील तीन ब्लॉकवर एकाच वेळी यशस्वी उपचार

    दिशा सामाजिक सेवा संस्था येथे कॉम्प्यूटराइज्ड पद्धतीने व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

    क्रिकेटचा लाईव्ह स्कोर

    आजचे हवामान

    कल्याणमधील वातावरणाची आजची स्थिती

    Kalyan
    +32
    °
    C
    High:+38
    Low:+29
    Partly Sunny
    आवर्जून वाचा

    भारत-पाक तणाव: सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर होणार कठोर कारवाई

    भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क. पहलगाम अतिरेकी हल्ल्याविरोधात भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर…

    अधिक वाचा

    येत्या मंगळवारी कल्याणातील या भागाचा पाणीपुरवठा राहणार 9 तास बंद

    वृद्धाश्रमातील आजी -आजोबांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी भारावले आमदार विश्वनाथ भोईर

    मानसिक आरोग्य ; सारथी कौन्सिलिंगचा “लेट्स टॉक मेंटल हेल्थ” उपक्रम

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Instagram
    • YouTube
    ग्लोबल कल्याण बद्दल थोडक्यात
    ग्लोबल कल्याण बद्दल थोडक्यात

    कल्याण शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कल्याण शहराला महत्त्व आहे. ग्लोबल कल्याण या पोर्टलमध्ये कल्याण शहराबद्दल अगदी ऐतिहासिक काळापासून ते आजपर्यंतची सर्व माहिती मिळेल. कल्याणमध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्थळे, प्रसिद्ध व्यक्तिमत्वे, कलाकार तसेच वैद्यकीय, शैक्षणिक आणि कल्याणमधील सध्याच्या घडामोडींविषयी माहिती मिळेल.

    Facebook Instagram YouTube
    प्रसिद्ध व्यक्तिमत्व

    अष्टपैलू व्यक्तिमत्व – डॉ. यती फाटक

    99 Views

    डॉ. चंद्रशेखर आष्टीकर – श्रीनिजधामानंदस्वामीं

    130 Views

    कवी आणि चित्रकार श्री. विजय सातपुते

    135 Views

    कवी आणि रंगकर्मी रवीन्द्र दामोदर लाखे

    185 Views
    Useful Links
    • About Kalyan
    • About us
    • Privacy Policy
    • Disclaimer
    • Contact us
    © 2025 by ग्लोबल कल्याण | Global Kalyan has collaboration with Local News Network (LNN Media) । Website Developed by Abhijeet Gosavi

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.