मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर व मनोदय ट्रस्टच्या स्थापनेचा हा महिना! मानस २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे तर मनोदय १८ व्या वर्षात!!दरवर्षी आम्ही या निमित्ताने वैविध्यपूर्ण रंजनशिक्षणाचा कार्यक्रम (मराठीत Edutainment) सादर करत असतो.
या वर्षी २९ जून रविवार रोजी संध्याकाळी ५वाजता आम्ही घेऊन येत आहोत ” पासवर्ड आनंदाचा !” दाखवणारआहोत ४ शॉर्ट फिल्म्स आणि त्यानंतर ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ राजेंद्र बर्वे व ज्येष्ठ फिल्म अभ्यासक,सोमैय्या महाविद्यालयाचे प्रा.अभिजीत देशपांडे यांच्याबरोबर डॉ अद्वैत पाध्ये व त्यांची सहकारी समुपदेशक अदिती प्रभूघाटे कामत संवाद साधत हा “पासवर्ड” उलगडणार आहोत!!
विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,ही विनंती !