॥श्रीगुरुदेवदत्त प्रसन्न॥
श्रीनिजधामानंदस्वामी यांचा संक्षिप्त परिचय:
श्रीनिजधामानंदस्वामी यांची गुरुपरंपरा:-
श्रीगुरुदेवदत्त
श्री श्रीपादवल्लभ
श्री नृसिह सरस्वती
श्री स्वामी समर्थ
श्री यशवंत देवमामलेदार
श्रीपद्मनाभाचार्यस्वामी
श्री गजाननस्वामी बोरकर
श्रीअवधूतस्वामी महाराज
श्रीनिजधामानंदस्वामी
श्रीनिजधामानंदस्वामींना सद्गुरुप्राप्ती:
श्रीनिजधामानंदस्वामीं (डॉ चंद्रशेखर) हे मुंबई विद्यापीठातून (ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये) पीएच.डी. आहेत. ते मुंबईच्या तीन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये डायरेक्टर होते. श्रीनिजधामानंदस्वामींचे खापरपणजोबा श्रीसंत केशवदास महाराज हे नाथसंप्रदायाचे मोठे योगीसिद्ध-पुरुष होते. त्यांचा मठ व समाधी मध्यप्रदेशातील- छिंदवाडा या ठिकाणी आहे. त्यांच्या एका पदाने श्रीनिजधामानंदांच्या जीवनात आध्यात्मिक क्रांती घडवून आणली. त्या पदाच्या ओळी पुढील- प्रमाणे – ‘‘धाव पाव बा सद्गुरुराया। रत्न खचित हे काया वाया। पारखिता तुज निगम बोलती। कदापिना सोडी तव पाया॥ या ओळीने त्यांना सद्गुरु भेटीचा ध्यास लागला व ते श्रीसंत केशवदासांचे सद्गुरु श्रीशिवनाथनिरंजन यांच्या नागपूर येथील- समाधी मंदीरात रोज जाऊ लागले व उत्कट भावाने प्रार्थना करु लागले धाव पाव बा सद्गुरुराया। श्रीशिवनाथ निरंजनांचे समाधीस्थान हे अत्यंत जागृत स्थान समजले जाते. तेथे केलेली इच्छा लगेच पूर्ण होते. याचे प्रत्यंतर श्रीनिजधामानंदस्वामींना लगेच आले. काही दिवसातच त्यांना एम्लायमेंट एक्सेंज मधून एक इंटरव्हयू कॉल – आला तोही त्याचे त्यांच्या मुदत संपलेल्या कार्डावर. हे अघटितच होते. त्याहीपेक्षा अघटित घटना पुढे घडली. इंटरव्ह्यूच्या दिवशी एअर इंडियाच्या नरिमन पॉइंट येथील तेराव्या मजल्यावर ते मुलाखतीसाठी जाउन पोहचले तेव्हा त्यांची ट्रेन लेट आल्यामुळे त्यांना पोहचायला उशीर झाला होता. तरी त्यांनी विनंती केल्यावर त्यांची मुलाखत घेतली गेली व ते मुलाखतीत पास झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर 15 दिवसांनी त्यांना अपॉइंटमेंट आर्डर मिळाली व ते कामावर रुजू झाले. ते राहण्यासाठी जागा शोधत असतानाच त्यांना श्रीअवधूतस्वामी महाराजांची भेट झाली. त्यांनी त्यांना आपल्या विलेपारले येथील घरीच राहण्याची व्यवस्था करुन दिली. दुसरा योगायोग असा की आमच्या सांप्रदायाचे श्री यशवंतराव देवमामलेदार व माझे खापरपणजोबा श्रीसंत केशवदास महाराज हे दोघेही समकालीन संतपुरुष होते व दोघांचीही एकमेकाशी मैत्री होती व त्यांची नेहमी गाठभेट होत असे. असे काही प्रसंग त्यांच्या चरित्रात लिहिले आहेत. मधुपुरीच्या श्रीसंततुकाराम महाराजांच्या मंदिरात तर अजूनही या दोघांचे फोटो समोरासमोर लावलेले आहेत. म्हणूनच श्रीनिजधामानंदस्वामींनाही श्रीदेवमामलेदारांच्या या परंपरेत येण्याची प्रेरणा व संधी मिळाली हा ईश्वरी योगायोगच होय.
श्रीनिजधामानंदस्वामींनी दीर्घकाळ 45 वर्षे सद्गुरुची व त्यांच्या कार्याची सेवा केल्यावर श्रीसद्गुरुच्या आज्ञेप्रमाणे (स्वप्नात येऊन सांगितल्यावर) त्यांनी लोककल्याणाचे कार्य नि:स्पृहपणे सुरु केले. दरम्यानच्या काळात सलग 30 वर्षे त्यांना श्रीपरमानंदस्वामींचा प्रत्यक्ष सहवास संवाद सत्संगती याचा लाभ मिळाला. श्रीनिजधामनंदस्वामींची प्रवचने व मार्गदर्शन हे पूर्णपणे नि:शुल्क असतात. गेली 45 वर्षे ते सातत्याने व अखंडपणे प्रवचन निरुपण करीत आहेत. सध्या भगवद्गीतेवर त्यांची प्रवचने दर गुरुवारी व हरिपाठावरील- प्रवचने दर शुक्रवारी गुगुल- मीटवर होत आहेत.
श्रीनिजधामानंदस्वामींचे प्रकाशीत ग्रंथ:
1- श्रीमद् भागवत रहस्य स्कंध 1
2- श्रीमद् भागवत रहस्य स्कंध 2
3- भावसरिता – गेय पदे व अभंग आध्यात्मिक हिदी व मराठी गजल-
4- परमानंद घनामृत धारा – आध्यात्मिक कथाकाव्य संगीत नाट्य ग्रंथ
5- श्रीसद्गुरुबोध भाग १ते ५ ला (प्रनोत्तरे- आध्यात्मिक विषयावर गुरुशिष्य संवाद)
लवकरच प्रकाशीत होत असलेले ग्रंथ:
1- भगवत गीता सांख्ययोगावरील- सखोल- व विस्तृत निरुपण
2- भगवत गीता कर्मयोगावरील- सखोल- व विस्तृत निरुपण
3- श्रीमद्भागवत रहस्य स्कंध 3
4- श्रीसद्गुरुबोध भाग 2
5- श्रीसद्गुरुबोध भाग 3
धार्मिक संगीत नृत्य नाटक व भक्तिसंगीताचे कार्यक्रम:
श्रीनिजधामानंदस्वामींनी दोन नाटके लिहिली आहेत व त्यांचे प्रयोग सुद्धा खूप लोकप्रीय झालेले आहेत.
1- संगीत नृत्य नाट्य अहल्योध्दार
2- संगीत नृत्य नाट्य दिंडी आख्यान
3- मराठी हिदी गीते व गजलांचे कार्यक्रम गायक वादकांना जर याचे कार्यक्रम करावयाचे असतील- तर संपर्क करावा.
मूर्तिची प्रतिष्ठापना:
1- श्रीनिजधामानंदस्वामींचे एक शिष्य श्री दीपक नाईक यांच्या कोकणातील- कणकवली येथील- पळसंब या गावी त्यांच्या आंमराईत दत्तप्रभूंच्या मूर्तिची प्राणप्रतिष्ठा श्रीनिजधामानंदस्वमींच्या हस्ते करण्यात आलेली आहे.
2- मुलुंड येथे दत्तपीठात त्यांचे शिष्य डॉ. श्री मयुरेश मुळे यांच्या घरी श्रीनिजधामानंदस्वामींच्या हस्ते सद्गुरुपादुकांची स्थापना करण्यात आलेली आहे.
3- कल्याण येथे त्यांचे शिष्य श्री. अविनाश जोशी यांचे निवासस्थानी श्रीकृष्ण मूर्तिची प्राणप्रतिष्ठा गोकुळाष्टमी 2022 रोजी करण्यात आली.
॥हरि ॐ तत् सत्॥