डोंबिवली दि.16 मार्च :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्या तिथीनुसार असलेल्या जयंतीनिमित्त डोंबिवली पूर्वेच्या घारडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या सायंकाळी हा सोहळा होणार असून त्यासाठी घारडा सर्कल चौकाकडे येणारे सर्व रस्ते आज रात्री १० वाजल्यापासून ते सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवलीतील घरडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येत आहे. महाराजांच्या या भव्य पुतळ्याचे उद्या सायंकाळी लोकार्पण केले जाणार असल्याने हा वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
वाहतुकीत असा असणार आहे बदल…
*प्रवेश बंद-* डोंबिवली शहरातून घरडा सर्कल कडे येणाऱ्या वाहनांना शिवम हॉस्पिटल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
*पर्यायी मार्ग-* सदर वाहने जिमखाना रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.
*प्रवेश बंद-* सुयोग रिजन्सी मार्गे घरडा सर्कल कडे येणाऱ्या वाहनांना आर. आर. हॉस्पिटल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
*पर्यायी मार्ग* – सदर वाहने कावेरी चौक, एम. आय. डी.सी. मार्गे इच्छित स्थळी जातील.
*प्रवेश बंद-* खंबाळपाडा रोड, ९० फीट रोड, ठाकुर्ली रोड मार्गे घरडा सर्कल कडे येणाऱ्या वाहनांना बंदिश पॅलेस हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
*पर्यायी मार्ग* – सदर वाहने सावित्रीबाई फुले नाट्यगृह मार्गे इच्छित स्थळी जातील.
*प्रवेश बंद* – आजदे गाव, आजदे पाडा येथून घरडा सर्कल कडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
*पर्यायी मार्ग-* सदर वाहने एम. आय. डी. सी. अंतर्गत रस्त्यांनी इच्छित स्थळी जातील.