आज आपण भेटतो आहोत साप्ताहिक कल्याण वैभवचे संपादक श्री . विश्वास शंकर कुळकर्णी ह्यांना .
श्री . विश्वास शंकर कुळकर्णी ह्यांचे शालेय व काॅलेजचे शिक्षण भिवंडी येथे झाले. एस.एस.सी. झाल्यानंतर काॅलेजचे शिक्षण पार्ट टाइम नोकरी करीत भिवंडी येथील बी. एन. एन. काॅलेज मध्ये घेतले. पुढे भिवंडी येथील दी अमलगमेटेड इलेक्ट्रीसीटी कंपनीत वडिलांच्या ओळखीने मार्च १९७२ साली नोकरी मिळाली. कालांतराने दि १-१०-१९७८ रोजी म.रा.वीज मंडळाने सदर खाजगी कंपनीला ताब्यात घेतले. त्या नंतर शासकीय सेवेत प्रवेश झाला. म. रा. वीज मंडळ व पुढे विद्युत वितरण कंपनी अशी एकत्रित सुमारे ४२ वर्षांची प्रदीर्घ सेवा करुन दि ३१-७-२०१३ रोजी सेवेतून सेवानिवृत्त झाले.
वीज मंडळाच्या सेवेत असताना १९८० सालापासून कामगार चळवळीत सक्रिय सहभाग राहीला. अगदी डिव्हीजनच्या सेक्रेटरी पदापासून ते राज्यस्तरीय संघटनेच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. काॅलेज मध्ये असल्यापासून लिखाणाचा तसेच कविता करण्याचा छंद जडला होता. सन २००९ मध्ये त्यांचा ‘ भावनांच्या लाटांवर शब्दांचा प्रवास ‘ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. वीज मंडळ/ वितरण कंपनीत अनेक कार्यक्रमांच्या सुत्र संचालनाची जबाबदारी विश्वासाने त्यांच्यावर सोपवली जायची व ते ती चोखपणे पार पाडायचे. सेवानिवृत्ती नंतर ते काही काळ कल्याण भाजपा चे जिल्हा सहप्रसिद्धीप्रमुख म्हणून कार्यरत होते.
पुढे सप्टेंबर २०१५ मध्ये त्यांनी स्वतःच्या मालकीच्या ‘साप्ताहिक कल्याण वैभव’ (www.kalyanvaibhav.com) या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ केली. हळूहळू या वृत्तपत्राची व्याप्ती ही ठाणे जिल्ह्याचे सीमोलंघन करीत नाशिक, मालेगाव, धुळे, पुणे, सांगली, कोल्हापूर व थेट बुरहाणपूर ( मप्र) पर्यंत पोहोचली. या साप्ताहिका अंतर्गत नियमित प्रसिध्द होणारी दृषटीक्षेपातून या सदरामधील विविध विषयांवरील दर्जेदार लेख, काव्य सुगंध सदरा अंतर्गत प्रसिद्धीस दिलेल्या होतकरु कवींच्या भावस्पर्शी कविता व विवेक विचार या सदराचया माध्यमातून श्री हेमंत रामदासी, नाशिक यांनी संकलित केलेले स्वामी विवेकानंद यांचे मौलिक, प्रबोधनात्मक विचार व एकूणच या वृत्तपत्राचा कागद व छपाईचा दर्जा तसेच बातमीसाठी घडलेल्या घटनांचा घेतलेला अचुक वृत्त वेध, बातम्यांची नेटकी मांडणी या व इतरही काही कारणांमुळे अल्पावधीतच कल्याण वैभव साप्ताहिकाला अपार लोकप्रियता मिळाली आणखी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या साप्ताहिकाने १० वर्षांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे सा कल्याण वैभवाच्या आठ दिवाळी विशेषांकांना गेल्या १० वर्षांत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे पारितोषिक देऊन पुरस्कृत करण्यात आले आहे. काळानुरूप बदल घडवण्याचा दुरदर्शीपणा संपादक म्हणून श्री. कुळकर्णी यांनी दाखवला व मे २०२४ पासून कल्याण वैभव डिजिटलाईज करण्यात आले आहे. सदर साप्ताहिक डिजिटल केल्यापासून वाचकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
विद्युत वितरण कंपनीमधील एक सेवानिवृत्त कर्मचारी सेवानिवृत्ती नंतर एक साप्ताहिक नाबाद १० वर्ष यशस्वीरित्या चालवू शकतो. आहे ना अचंबित करणारी गोष्ट?
वेबसाईट: www.kalyanvaibhav.com
1 Comment
अभिनंदन श्री.विस्वास शं.कुलकर्णी साप्ताहिक कल्याण वैभव चे संपादक. श्री.विश्वास शं. कुलकर्णी .
पुढील वाटचालीस अनेक उत्तम शुभेच्छा .