Close Menu
Explore Kalyan CityExplore Kalyan City
    अधिक पहा:
    • कविता
    • आरोग्यवर्धक
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान
    • न्युज आणि मीडिया
    Facebook X (Twitter) Instagram
    • कविता
    • आरोग्यवर्धक
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान
    • न्युज आणि मीडिया
    Facebook Instagram YouTube
    Explore Kalyan CityExplore Kalyan City
    • मुख पान
    • कला आणि संस्कृती

      पी. आर. क्रिएशन्स आणि स्वरस्नेह सांगीतिक सृती, कल्याण प्रस्तुत ‘सावळे सुंदर रूप मनोहर’

      अधिक वाचा

      सुभेदारवाडा कट्टा आणि आकाश मित्र मंडळ आयोजित ‘हा खेळ सावल्यांचा ‘

      अधिक वाचा

      हिंदु नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त सांगितिक कार्यक्रम ‘मिळुनी आम्ही साऱ्याजणी’

      अधिक वाचा

      कर्मयोगाचे शास्त्रशुद्ध शिक्षण (नि:शुल्क)

      अधिक वाचा

      उज्वला मंडळ ‘अमृत वर्ष’ सांगता समारंभ

      अधिक वाचा
    • प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व

      डॉ. चंद्रशेखर आष्टीकर – श्रीनिजधामानंदस्वामीं

      अधिक वाचा

      विश्वास शंकर कुळकर्णी – संपादक, साप्ताहिक कल्याण वैभव

      अधिक वाचा

      महिलांचे कर्तृत्व – सौ. सीमा जयंत गोखले

      अधिक वाचा

      अष्टपैलू व्यक्तिमत्व – स्वप्नगंधा रमेश करमरकर

      अधिक वाचा

      श्री. अविनाश हरड – ओळख एका सच्च्या सामाजिक कार्यकर्त्याची

      अधिक वाचा
    • वैद्यकीय
      1. आरोग्यवर्धक
      2. पुनर्वसन केंद्रे
      3. View All

      इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद – 300 हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग

      अधिक वाचा

      मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर व मनोदय ट्रस्टचा वैविध्यपूर्ण रंजनशिक्षणाचा कार्यक्रम “पासवर्ड आनंदाचा”

      अधिक वाचा

      कल्याणात कोविडमुळे एका महिलेचा मृत्यू ; आणखी दोन रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची केडीएमसी प्रशासनाची माहिती

      अधिक वाचा

      मानसिक आरोग्य ; सारथी कौन्सिलिंगचा “लेट्स टॉक मेंटल हेल्थ” उपक्रम

      अधिक वाचा

      कल्याण स्टेशन परिसरामध्ये फिरस्ते, व्यसनाधीन झालेले इसम व्यसनमुक्ती केंद्रात दाखल

      अधिक वाचा

      दिशा सामाजिक सेवा संस्थेत साजरी झाली गुरुपौर्णिमा

      अधिक वाचा

      दिशा सामाजिक सेवा संस्था येथे कॉम्प्यूटराइज्ड पद्धतीने व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

      अधिक वाचा

      दिशा सामाजिक सेवा संस्था – एक पाऊल व्यसनमुक्तीकडे

      अधिक वाचा

      5 दशकांपासून मृत्यूला आस्मान : कल्याणच्या या मृत्युंजयाची इंडिया, एलाईट बुककडून दखल

      अधिक वाचा

      कौतुकास्पद : कल्याणातील इंडीयन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरमध्ये तिघा रुग्णांना मिळाले जीवदान

      अधिक वाचा

      अभिमानास्पद : कल्याणातील जी प्लस रुग्णालयात हृदयातील तीन ब्लॉकवर एकाच वेळी यशस्वी उपचार

      अधिक वाचा

      दिशा सामाजिक सेवा संस्था येथे कॉम्प्यूटराइज्ड पद्धतीने व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

      अधिक वाचा
    • जागरूकता

      कल्याण पश्चिमेमध्ये पोलीसांकडून काढण्यात आला रूटमार्च

      अधिक वाचा

      थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचा प्लॅन केलाय, मग पोलिसांनी दिलीय ही महत्त्वाची माहिती

      अधिक वाचा

      कल्याणातील आयमेथॉनमध्ये धावले 5 हजार धावपटू ; सामाजिक संस्थेच्या मदतीसाठी राबवण्यात आला उपक्रम

      अधिक वाचा

      केडीएमसी अग्निशमन दलातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

      अधिक वाचा

      जागतिक मनआरोग्यदिनानिमित्त “श्लोक मनाचे, आरोग्य मनाचे” कार्यक्रमाचे आयोजन

      अधिक वाचा
    • सण आणि उत्सव

      वीटभट्टीवरील या वंचित मुलांच्या चेहऱ्यावर उमटला सप्तरंगी आनंद; अनुबंध संस्थेतर्फे अनोख्या होळीचे आयोजन

      अधिक वाचा

      आला गणेशोत्सव, आला अगरबत्ती उत्सव!

      अधिक वाचा

      रामनवमी

      अधिक वाचा

      होळी

      अधिक वाचा
    • स्थळे

      बिर्ला मंदिर

      अधिक वाचा

      पोखरण मंदिर – अध्यात्म आणि विज्ञान यांचा अनोखा मिलाफ

      अधिक वाचा

      लोनाडची लेणी

      अधिक वाचा

      सुभेदार वाडा – एक ऐतिहासिक वास्तू

      अधिक वाचा

      काळा तलाव

      अधिक वाचा
    • क्राईम वॉच

      गांधारी पुलावरील अपघातप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद; डंपरचालकासह मालकावरही सदोष गुन्हा दाखल करण्याची आमदारांची मागणी

      अधिक वाचा

      भारत-पाक तणाव: सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर होणार कठोर कारवाई

      अधिक वाचा

      कल्याण पूर्वेच्या कचोरेतील आरएसएसच्या शाखेवर दगडफेक; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

      अधिक वाचा
    Explore Kalyan CityExplore Kalyan City
    तुम्ही आता येथे आहात -Home»प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व»कवी आणि चित्रकार श्री. विजय सातपुते

    कवी आणि चित्रकार श्री. विजय सातपुते

    139 Views
    Showing 1 of 1

    श्री. विजय सातपुते कल्याणमध्ये कवी चित्रकार म्हणून ओळखले जातात.. सेंट्रल रेल्वेज मधून ते इंजिनिअर म्हणून निवृत्त झाले. कविता लिहिणे हे त्यांचं पॅशन आहे. त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांना राज्य स्तरीय काव्य स्पर्धेत त्यांना पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले आहे. विजय सातपुते ह्यांनी प्रसिध्द कवयत्री ज्ञानपिठ पारितोषिक विजेत्या अमृता प्रीतम यांच्या ऐंशी कवितांचा त्यांनी अनुवाद केला आहे.

    चित्रकारिता त्यांच्या घराण्यात परंपरेने चालत आली आहे. अर्कचित्र हया शैलीत त्यांचे विशेष प्राविण्य आहे. १९९६ साली हिन्दुस्थान टाईम्सने आयोजित केलेल्या अर्कचित्र स्पर्धेत (अखिल भारतीय पातळीवर ) त्यांना यश मिळाले आहे. ते स्वत: ‘खोखो’ या देशी खेळात राष्ट्रिय स्तरावरील मातब्बर खेळाडू होते . तसेच त्यांनी प्रशिक्षीत केलेले श्री.अनिल तुपकर, श्री राजन गांधी,  श्री . किशोर गजकल, श्री.  राजेंद्र सकपाळ हे खेळाडू राष्ट्रिय पातळीवर तसेच आंतर महाविद्यालयीन पातळीवर खेळले आहेत. श्री. विजय सातपुते यांना काव्य साहित्य तत्वज्ञान यांत विशेष रूची असून ते बहुश्रूत वाचक आहेत.

    श्री. विजय सातपुते यांनी रेखाटलेली काही चित्रे:


    श्री.
    विजय सातपुते यांनी रेखाटलेली अर्कचित्रे:

     

    श्री. विजय सातपुते ह्यांच्या काही निवडक कविता:

    कवितेचे हात

    तुझ्यासह निघून गेलेले
    रंगभरल्या क्षणपळांचे ते दिवस
    आता परत येणार नाही

    सुंदर नव्हतो मी
    पण तुझ्या बोलांनी किती
    मोहर मनावर फुलायचे
    ओळीतील शब्दा शब्दांवर
    तुझ्या ओठांचे मध लागायचे

    आता परत फुलून येणार नाहीत
    ते कळ्यां फुलांचे दिवस
    आत बाहेर झरणार नाहीत
    भिजल्या भावनांचे झरे

    किती सोसल्या नकारांचे
    कळ लावणा-या अभावांचे
    स्पष्ट दिसताएत आलेख
    मनाच्या सुजाण पडद्यावर

    असे असुनही कसे पोहचतात
    खुणा तुझ्या ओढाळ मनाच्या
    दूर क्षितीज रेषेेवर
    उरल्या सुरल्या जलधारा
    साठवून ठेवणा-या धूसर मेघांना
    कशी लागते व्याकुळ ओढ
    कसा झिरपतो हा विश्वास
    आतल्या संभ्रमीत अवकाशात

    आणि तरीही
    पापण्यांच्या आत थबकलेले
    अश्रुंचे दाट ओहोळ
    अर्ध मिटल्या पापण्यांवर
    झुकलेले आभाळ सर्द
    अन् प्रयासाने
    मनावर फिरवलेला संयमाचा
    गडद रंगी कुंचला

    दिसण्याच्या पलिकडेही केवळ
    तुझी असण्याची ऊब
    पुरते आहे माझ्या प्राणांना
    धरून ठेवताएत
    अशक्त होत जाणारे श्वास
    आणि कविता लिहिणारे
    माझे सृजनशील हात ।।

    —————————————————————————————

    विठ्ठला

    विठ्ठला , तुझ्या दाराशी येऊन
    इथेच थबकलो आहे
    येतांना कवितेचा कागद
    सवे घेऊन आलो होतो
    म्हंटल , आल्यावर सगुण तुझे रुप
    करावं कवितेत साकार ।

    इथे आलो तर ही गर्दी
    उसळलेली , भक्तीने भिजलेली
    हजारो घामेजली कपाळं
    तुझ्या नावाची टिळा लावलेली
    कुठे भक्तांनी धरलेले रिंगण
    धूळ माखल्या पावलांचे नर्तन
    कुठे मिचमिचत्या डोळ्यांत
    तुझ्या रुपाचे पावन दर्शन
    मंदिराच्या पायरीपासून फुटलेली
    रांग पुढे क्षितिजान्त पसरतांना
    सकाळचा उभा दर्शनेच्छू
    संध्यासमयी मंदिरात शिरतांना ।।

    मिनिटभराचे दर्शन आणि
    पुढच्याच क्षणी भक्त
    बाहेरच्या उदंड जनसागरात
    विलीन होतांना रिक्त
    तुझे रूप डोळाभर
    आठवून आठवून साठवतांना
    थकल्या श्रांत गळ्यात
    विठ्ठलाचे नांव जपतांना
    घराकडे परतीची पाऊले
    जडशीळ होत जातांना ।।।

    मी तिथेच थांबलो
    झाडाखाली झोपलो निभ्रांत
    ठेवून कागद उशाशी
    विठ्ठलाचे करूनी चिंतन मनात
    पहाटेच साक्षात्कारी जाग आली
    कागदाकडे पाहिलं ——-
    मूर्तिमंत कविता तुझ्या नावानिशी
    झाली होती साकार ।।।।

    माझा विठ्ठल
    कवितेच्या शब्दांत बहरलेला
    माझी पंढरी
    कवितेच्या ओळीतून गहिवरलेली
    माझी चंद्रभागा
    कवितेच्या लयीतून वाहणारी
    माझी वारी
    कवितेच्या आशयातून पुढे सरकणारी

    विठ्ठला ! तुझे दर्शन झाले
    गळाभेट घडली
    माझी कविता कळसास पोहचली ।।

    —————————————————————————————

    मुकुट

    कुणीतरी मुकुट ठेवलाय
    भर शहरात रस्त्याच्या मधल्या चौकात
    तो नव्हता हिरामाणकांनी गढवलेला
    कातरलेल्या हिरव्या धारदार पानांनी
    मुकुट होता मढविलेला
    होते त्याचे अस्तित्व सामान्य तरी वेगळे

    त्यानं लावलं सगळ्या चराचराला
    चौक , रस्ते , वाहने टांगे रिक्षा
    दुकानातल्या वस्तू , धनधान्ये
    खाण्यातील दाखवण्यातील बाळगण्यातील
    महत्वाचे बिनमहत्वाचे क्षुद्र अतिक्षुद्र
    सजीव निर्जीव वस्तुंना
    चौकाभोवती फेर धरायला

    सगळं चराचर त्याच्यापर्यंत पोचलं
    त्याला कह्यात घ्यायला
    तर ते सपशेल उताणं पडलं
    ते झालं पायाशी साचेबंद
    मुकुट होताच तसा चिरेबंद
    चौथ-यावरती शानदार
    त्याची हिरवी प्रभा अशी उंच हवेत
    लहरत राहिली जणू स्वयंसिध्द चंद्र

    त्यानं घेतला सर्वत्र कब्जा
    पसरली त्याची हुकूमत जगावर
    त्यानं दिला न प्रकाश न अंधार
    त्यानं दिला न पक्षी न गाणे न अवकाश
    तरीसुध्दा व्यापला अख्ख्या समष्टीत
    शब्दातून उगवणा-या अर्थाप्रमाणे ।

    —————————————————————————————

    हिरोशिमा

    कुणीतरी आग ओतली आहे
    त्या बेसावध भूमीवर
    जणू एकाच वेळी शेकडो सुर्य
    आग खावून कोसळले .

    बघता बघता एक अख्ख शहर
    आगीच्या भक्षस्थानी पडलंय
    एक नांदती बोलती संस्कृती
    गडप झालीय राखेच्या ढिगा-यात

    पानाफुलांचे हिरवे पिवळे घोस
    फुलपाखरांचे खुशाल बागडणे
    हिरव्या वनराईचा हिरवा शब्द
    वृक्षावरील गजबजता पर्णसंभार

    शाळांतील चिमण्यांचा चिवचिवाट
    बागेतील हसरी बोलती पाखरे
    कारखान्यातील निर्मितीचा धूर
    हितगूज करणारे गृहसंकुलांचे वृंद

    सगळं कसं भस्मसात झालंय
    ह्या भयाण जीवघेण्या तडाख्यात

    एक भयाण शांतता माखलीय
    ह्या सर्वदूर आसमंतात
    राखेचे प्रचंड ढिगारे भोवती
    जणू मृत अवशेषांचे कहर

    दूरदूरपर्यंत धगधगते पठार
    आत खोलवर जीवजंतूंचा संहार
    वाटले आता संपली उद्याची आशा
    गाडली गेली जगण्याची भाषा

    तेवढ्यात दिशांच्या कोनातून
    एक आवाज हलकासा आलाय
    राखेच्या थराखालून एक चिमुकले
    कोवळे हिरवे तृणांकूर डोकावतेय

    नकळत वा-याच्या लहरीवरती
    गाणे सृजनाचे हळुवार पसरतेय
    अद् भूत चैतन्याच्या प्रवाहाकाठी
    हिरोशिमा पुन्हा नव्याने वसतेय ।।

    —————————————————————————————

    मायेची तगर

    परसात उभी तगर अशी हिरवीगार
    शुभ्र फुलांची आरास लेऊन अंगभर
    नांदत्या घराची सून देखणी सकवार
    उभी लाजरी लजवंती अशी दारावर ।१।

    ठेंगणी ठुसकी , बांधा तो अटकर
    हिरव्या पर्णांवर लोभस ते दहिवर
    सुस्नात तजेलदार नाजूक अलवार
    भरल्या गळ्यात खुलते काळे सर ।२।

    प्रत्येक ऋतूत बहरून मस्त फुलते
    ऊन कोवळे सोनेरी अंगावर झेलते
    हिरवी सावळी लेणी अपार सुंदर
    पोपटी शालू खुले चांदण्याची जर ।३।

    केळीच्या बुंध्याशी पाणी झुळझुळते
    आंब्याच्या फांद्दयात पडछाया हालते
    अंगणात ओल्या हळदीच्या पावलांनी
    मोहरून तगर अंगभर उभी थरथरते ।४।

    मिरगातील पाऊस बरसे अंगणभर
    माहेरवाशीण जोजवते मायेची तगर
    कौलारू घर टपटप गळती पागोळ्या
    डोळ्यांत कां ग आसवांच्या रांगोळ्या ।५।

    घर सारे बुडते ऊरे आठवणींचा झोका
    कित्येक चाफे फुललेत त्यानंतर आता
    पानांआड अजून फुगून भिजली पाखरे
    मावळतीच्या ऊन्हात तगर एकटीच झुरे ।६।

    —————————————————————————————

    आकान्त

    परत एकदा आकाशाने पंख पसरले
    युगांयुगांचे संचित धरतीवर सांडले

    तेजाचा लाल गोळा ढगांच्या पाठीवरून
    घरंगळत क्षितीजाच्या कडेवर अडकला
    तेव्हा मनुजाच्या थरथरत्या हातातले
    प्राक्तनाचे फळ पिकून बेवारस झाले .

    अनाहूत स्वातंत्र्याचे गीत गाणारे पक्षी
    सागराच्या लाटेवर विखुरलेले आपुलेच
    पंख मोजीत असतां किना-यावरची झाडे
    अगतिकपणे हिरवे अश्रू ढाळतात

    अशावेळी मनुजाचे मन दाही दिशांना धावते
    हातातले प्राक्तनाचे फळ त्याला कुठेकुठे नेते

    अज्ञाताच्या गूढ काळोखात त्याच्या
    इच्छांचे हात लवलवू लागताच , त्याच्या
    अटळ भाग्याचे सनातन क्रूस त्याच्या
    भाळावर खोदले जातात

    मग उरतात दिशाहीन धावणारे अन्तहीन रस्ते
    जे भूतकाळाचा श्वास घेत नाही आणि ……….
    भविष्याचा उच्छवासही टाकत नाही
    उरतो फक्त वर्तमानाचा न संपणारा आकान्त .

     

    Showing 1 of 1
    Share. Facebook Twitter WhatsApp Telegram Email

    संबंधित लेख

    डॉ. चंद्रशेखर आष्टीकर – श्रीनिजधामानंदस्वामीं

    अधिक वाचा

    विश्वास शंकर कुळकर्णी – संपादक, साप्ताहिक कल्याण वैभव

    अधिक वाचा

    महिलांचे कर्तृत्व – सौ. सीमा जयंत गोखले

    अधिक वाचा
    Leave A Reply Cancel Reply

    मन मानसी

    नमस्कार, मी मानसी…आपल्या सगळ्यांच्याच  रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या साध्या साध्या प्रसंगातून, घटनांतून, मला पटकन जाणवून जाणाऱ्या..अगदी लोकल ने प्रवास करताना पटकन कुठे काही निरिक्षणातून सुचलेल्या… भावना, व्यथा, आनंद, विनोद, … व्यक्त करणाऱ्या मला अचानक सुचलेल्या या माझ्या गोष्टी.. आणि ललित लेख आहेत…

    खरं तर..मी एक सामान्य चाकरमानी व्यक्ती आहे…एकीकडे नोकरी आणि एलएलबीच शिक्षण.. अशा दोन दगडांवर पाय ठेवून जमेल तितकं .. लिहायचा प्रयत्न करतेय..

    अधिक वाचा: मन मानसी

    Website starts from INR. 5999/-

    आरोग्याबद्दल

    5 दशकांपासून मृत्यूला आस्मान : कल्याणच्या या मृत्युंजयाची इंडिया, एलाईट बुककडून दखल

    कौतुकास्पद : कल्याणातील इंडीयन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरमध्ये तिघा रुग्णांना मिळाले जीवदान

    अभिमानास्पद : कल्याणातील जी प्लस रुग्णालयात हृदयातील तीन ब्लॉकवर एकाच वेळी यशस्वी उपचार

    दिशा सामाजिक सेवा संस्था येथे कॉम्प्यूटराइज्ड पद्धतीने व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

    क्रिकेटचा लाईव्ह स्कोर

    आजचे हवामान

    कल्याणमधील वातावरणाची आजची स्थिती

    Kalyan
    +32
    °
    C
    High:+38
    Low:+29
    Partly Sunny
    आवर्जून वाचा

    शहरातील खड्ड्यांची गांभीर्याने दखल, खड्डे भरण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर होणार – शहर अभियंता अनिता परदेशी

    कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी, विशेषतः डांबरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची प्रशासनाने गांभिर्याने दखल घेतली असून हे खड्डे…

    अधिक वाचा

    इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद – 300 हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग

    मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर व मनोदय ट्रस्टचा वैविध्यपूर्ण रंजनशिक्षणाचा कार्यक्रम “पासवर्ड आनंदाचा”

    स्वतःचा जीव धोक्यात घालून तिघांना वाचवणाऱ्या पिता पुत्राचा कल्याणच्या तहसिलदारांकडून गौरव

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Instagram
    • YouTube
    ग्लोबल कल्याण बद्दल थोडक्यात
    ग्लोबल कल्याण बद्दल थोडक्यात

    कल्याण शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कल्याण शहराला महत्त्व आहे. ग्लोबल कल्याण या पोर्टलमध्ये कल्याण शहराबद्दल अगदी ऐतिहासिक काळापासून ते आजपर्यंतची सर्व माहिती मिळेल. कल्याणमध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्थळे, प्रसिद्ध व्यक्तिमत्वे, कलाकार तसेच वैद्यकीय, शैक्षणिक आणि कल्याणमधील सध्याच्या घडामोडींविषयी माहिती मिळेल.

    Facebook Instagram YouTube
    प्रसिद्ध व्यक्तिमत्व

    अष्टपैलू व्यक्तिमत्व – डॉ. यती फाटक

    103 Views

    कवी आणि चित्रकार श्री. विजय सातपुते

    139 Views

    डॉ. चंद्रशेखर आष्टीकर – श्रीनिजधामानंदस्वामीं

    140 Views

    कवी आणि रंगकर्मी रवीन्द्र दामोदर लाखे

    187 Views
    Useful Links
    • About Kalyan
    • About us
    • Privacy Policy
    • Disclaimer
    • Contact us
    © 2025 by ग्लोबल कल्याण | Global Kalyan has collaboration with Local News Network (LNN Media) । Website Developed by Abhijeet Gosavi

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.